College Programme


डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुुंडकर कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे शिक्षक दिन उत्साहात साजरा



येथील डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुुंडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बाळापूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे दिनांक ५ सप्टेंबर २०२३, मंगळवार रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कला शाखा प्रमुख डॉ. प्रकाश वानखडे, वाणिज्य शाखाप्रमुख प्रा. शरद कुलट व विज्ञान शाखा प्रमुख व IQAC समन्वय डॉ. सुनील उन्हाळे व प्रा. डॉ. रविंद्र ढोरे,वनस्पती शास्त्र विभाग हे उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. बी. भावसार यांनी तर आभार प्रदर्शन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. अल्पना देवकर यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक हजर होते.



सहकार महर्षी कै डॉ. वा. रा. ऊर्फ अण्णासाहेब कोरपे जन्मशताब्दी महोत्सव समिती व डॉ. मनोरमा व प्रा. ह. शं. पुंडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकोला-वाशिम जिल्ह्यास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिनांक. २४ ऑगस्ट २०२३






डॉ. मनोरमा व प्रा. ह. शं. पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बाळापूर येथे रा. से. यो. तर्फे मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत प्राचार्य गीताली पुंडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन




डॉ. मनोरमा व प्रा. ह. शं. पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बाळापूर येथे रा. से. यो. तर्फे मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत वृक्षारोपण संपन्न.




डॉ. मनोरमा व प्रा. ह. शं. पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बाळापूर येथे रा. से. यो. तर्फे मेरी माटी मेरा देश अभियान संपन्न




स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दि. १३ व १४ ऑगस्ट २०२३






डॉ मनोरमा व प्रा हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,बाळापूर आणि ज़िल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला तसेच तालुका विधी सेवा समिती, बाळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अँटी रॅगिंग या विषयावर सन्माननीय श्रीमती डी. एम. पाटील, (दिवाणी न्यायाधीश क. स्तर, बाळापूर) सन्माननीय व्हि. डी. गिते, (सह. दिवाणी न्यायाधीश क. स्तर, बाळापूर) सन्माननीयी पी. एस. अंभोरे (ऍडव्होकेट ) व महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ पुंडकर सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले



बाळापूर येथील डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक ९ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'मेरी माटी मेरा देश' हा उपक्रम माननीय प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये संपन्न झाला. मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत सर्वांनी पंचप्रण शपथ घेतली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत हा कार्यक्रम संपन्न झाला.